Ad will apear here
Next
स्वातंत्र्यदिनानिमित्त आझम कॅम्पसमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम

पुणे : स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या आझम कॅम्पसमध्ये ‘हाजी गुलाम मोहंमद आझम एज्युकेशन ट्रस्ट’चे अध्यक्ष मुन्नवर पीरभॉय यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एम. सी. ई सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार होते. 

या वेळी विद्यार्थ्यांनी ‘कलर्स इंडिया’ संकल्पनेवर आधारित देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यात ‘पै फॅशन डिझायनींग अकॅडमी’, ‘हाजी गुलाम मोहंमद आझम एज्युकेशन ट्रस्ट’चे उर्दू प्रायमरी स्कूल, ‘एम. सी. ई. एस इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल’, ‘अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल’, ‘अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कूल’, ‘गोल्डन ज्युबिली टेक्नीकल इन्स्टिट्यूट’, ‘तयैबिया यतीमखाना’, ‘पै पब्लिक स्कूल’च्या दीडशे विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. विद्यार्थ्यांनी स्व-संरक्षण आणि कराटेचेही प्रात्यक्षिक दाखविले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुमाना शेख आणि उषा परदेशी यांनी केले. या वेळी एम. सी. ई. सोसायटीच्या उपाध्यक्षा आबेदा इनामदार, संस्थेचे सचिव लतिफ मगदूम, प्रा. इरफान शेख, ‘आझम स्पोर्टस् अॅसकॅडमी’चे संचालक गुलजार शेख, एन. वाय. काझी,  डॉ. नझीम शेख, शाहिद इनामदार, हाबी कादीर कुरेशी आणि  सर्व पदाधिकारी उपस्थित होते. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NZQTBR
Similar Posts
अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त शिक्षणतज्ज्ञ डॉ. पी. ए. इनामदार यांचा गौरव पुणे : ‘विजापूरहून केवळ १५ रुपये घेऊन पुण्यात आलो. त्यानंतर अनेक संकटांवर मात करून महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी या शिक्षणसंस्थेचे कार्य वाढवले. या संस्थेच्या आज ३१ शाळा, महाविद्यालये आहेत. २८ हजार विद्यार्थी संस्थेत शिकत आहेत. या यशामध्ये ईश्वराची कृपा, गरिबांचे आशीर्वाद, पुणेकरांचे प्रेम
इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीला नॅशनल अॅक्रिडिटेशन पुणे : ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी’ (पदविका) महाविद्यालयाला ‘नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रिडिटेशन’ने मूल्यांकन करून प्रमाणित केले आहे. शैक्षणिक वर्ष २०१७-१८ ते २०२० या तीन वर्षांसाठी हे प्रमाणपत्र मिळाले आहे.
‘एमसीई’तर्फे गांधी जयंतीनिमित्त अभिवादन मिरवणूक पुणे : दीडशेव्या जयंतीनिमित्त महात्मा गांधींना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन (एमसीई) सोसायटीतर्फे गांधी जयंतीच्या पूर्वदिनी म्हणजेच एक ऑक्टोबरला अभिवादन मिरवणुकीचे आयोजन केले होते. यात ‘एमसीई’ सोसायटीतील अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी सहभागी झाले होते
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे उदघाटन पुणे : महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या (एमसीई) स्पोकन इंग्लिश अ‍ॅकॅडमीतर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे उद्घाटन झाले. आझम कॅम्पस येथे आयोजित या कार्यक्रमाचे उदघाटन बडोदा येथे होणार्‍या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language